Nitin Nagane - Bharat Bhalke
Nitin Nagane - Bharat Bhalke 
विश्लेषण

आमदार भालकेंना आणखी एक धक्का; जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे प्रचारापासून अलिप्त

भारत नागणे

पंढरपूर : आमदार भारत भालकेंचे अनेक जुने  सवंगडी ऐन निवडणुकीत सोडून गेल्याने आधीच कोंडीत सापडलेल्या भालकेंना पंढरपुरात आणखी एक धक्का बसला आहे.  काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन नागणे यांनी आमदार भालकेंचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आमदार भालकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आमदार भारत भालके यांनी ऐनवेळी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पंढरपूरच्या जागेवरचा आपला हक्क सांगत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे.  पंढरपुरात आघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंची राजकीय कोंडी झाली आहे.

महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक आणि अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांचे समोर तगडे आव्हान असतानाच जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी आमदार भालकेंना  विरोध करत प्रचारा पासून  अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून काँग्रेस कार्यकर्ते चार हात लांब असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील खदखद समोर आली आहे.

प्रचाराला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले असताना देखील पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रकाश पाटील यांनी ही भालकेंच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.
आमदार भालकेच्या प्रचारापासून काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्तेच चार हाथ तूर असल्याने भालकेच्या अडचणी वाढल्या आहेत. भालके काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर करणार, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT