विश्लेषण

खासदार गांधी, गायकवाड यांचा पत्ता कट; गडकरी, दानवे, मुंडे यांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 16 जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. सोळा पैकी 14 ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. फक्त लातूरचे खासदार सुनील गायकवाड आणि नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आला आहे.

गायकवाड यांचा पत्ता कट होणार, हे आधीच `सरकारनामा`ने प्रसिद्ध केले होते. गायकवाड यांच्या जागी लातूरचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  किरीट सोमय्या, ए. टी. पाटील या खासदारांचे भवितव्य टांगणीला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, माढा, बारामती या जागांचे उमेदवारे जाहीर करण्यात आलेले नाहीत. अपेक्षेप्रमाणे नगर येथे सुजय विखे पाटील हे आता कमळाच्या चिन्हावर लढतील.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे 


जालना- रावसाहेब दानवे

बीड- प्रीतम मुंडे

लातूर- सुधाकर शृंगारे

नगर- सुजय विखे

चंद्रपूर- हंसराज अहिर

नागपूर - नितीन गडकरी

गडचिरोली- अशोक नेते

अकोला- संजय धोत्रे

वर्धा- रामदास तडस

धुळे- सुभाष भामरे

नंदुरबार- हिना गावित

रावेर- रक्षा खडसे

मुंबई उत्तर-  गोपाल शेट्टी

उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन

भिवंडी- कपिल पाटील

सांगली- संजयकाका पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT