विश्लेषण

BJP Politics : भाजपचे 'पडलो तरी नाक वर....'

Sachin Deshpande

Chandigarh Election : भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजप आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयात चंदीगड महापौर निवडणुकीची सुनावणी सुरू आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव अर्थात लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशा वेळी भाजप नेत्यांनी चंदीगड महापौर पद वाचविण्यासाठी आपच्या तिघांना गळाशी लावणे हे लोकशाही मूल्याचे पतन असल्याचे चित्र समोर आले आहे.

जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप चंदीगड महापौर पदावर का घुटमळत आहे, अशी विचारणा होत आहे. चंदीगड महापौर निवडणुकीने देशातच नाही तर विदेशात सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नाक कापले गेले आहे. या विषयाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयात होत असून, संपूर्ण देशाचे याकडे लक्ष आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत पिठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी कॅमेऱ्यासमोर केलेल्या बॅलेटमधील हेराफेरीची जगभरात चर्चा आहे. इतक्यावरच हा विषय थांबला नाही तर आज सर्वोच्च न्यायालयात याविषयी पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी या हेराफेरीविषयी कबुली दिली. असे असताना भाजपच्या सत्तापिपासू नेतृत्वाने या सुनावणीपूर्वीच आपचे तीन सदस्य भाजपच्या गळाला लावत सत्तापिपासू वृत्तीचा परिचय दिला. हे खरोखर करणे गरजेचे होते काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यावर भाजपने तिथे सत्ता वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या या प्रयत्नाने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची साधी कल्पना भाजपश्रेष्ठींना येऊ नये, इतके कसे सत्तापिपासू नेतृत्व भाजपचे झाले ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत नैतिकदृष्ट्या भाजप पराभूत झाली असताना भाजप नेत्यांचे 'पडलो तरी नाक वर का ?' असा प्रश्न सूज्ञ मतदारांच्या मनात निर्माण होतो. देशाचा सर्वात मोठा लोकशाही उत्सव तोंडावर असताना भाजप नेते कुठल्या नैतिकतेचा मुद्दा मतदारांसमोर मांडतील, असा प्रश्न स्वाभाविकच मतदारांना पडणार आहे. चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना आता विरोधकांनी त्यावर तोंडसुख घेतल्यावरच भाजप गप्प बसणार आहे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंदीगड महापौर निवडणुकीच्या निकालात फेरफार करणारा पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर कारवाई चे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. गेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं चंदीगड महापौर निवडणुकीत गैरप्रकार झाल्याबद्दल निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या पिठासीन अधिकाऱ्याला झाप झाप झापलं होतं. तसेच मतमोजणीत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत, तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? असा सवालही केला होता. कोर्टाच्या या कडक टिप्पणीनंतर काल रविवारी भाजपचे नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, यानंतर आता चंदीगड महापौरपदाची निवडणूक पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपचे तीन नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने महापालिकेतील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. भाजपकडे आधीच एका खासदारासह 15 मते आहेत. 'आप'च्या 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा आकडा 18 वर पोहोचला आहे. एका अकाली दलाच्या मतांची भर पडल्यास ही संख्या 19 वर जाईल. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा महापौर निवडणुका घेण्याचा निर्णय दिल्यास भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा स्वतः महापौर करेल. पूनम देवी, नेहा मुसावत आणि गुरचरणजीत सिंग काला यांनी चंदीगड भाजपचे माजी अध्यक्ष अरुण सूद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. चंदीगडच्या महापौरपदाची खुर्ची अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे सोनकर यांच्या राजीनाम्यानंतर 'आप' सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या तीनपैकी एका नावाला मान्यता देतील. हे सर्व करण्याची गरज खरच होती काय ? असा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. केवळ आप (Aap) आणि काँग्रेस (Congress) यांचा अर्थात इंडिया (INDIA) आघाडीचा पराजय दाखविण्याच्या नादात भाजप नेत्यांनी त्यांची सत्तापिपासू भूमिका केवळ देशात नाही तर जगासमोर मांडल्याचे चित्र आहे. यालाच भाजप नेतृत्वाची 'पडलो तरी नाक वर' ही भूमिका म्हणावी लागेल. पराभव स्वीकारणे हे लोकशाहीत आवश्यक असताना कसे ही करून आम्हीच विजयी होणार ही भूमिका मतदारांना समजत नाही इतके मतदार दूध खुळे नक्कीच नाहीत. हा सर्व प्रकार लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पूर्वी होत असताना भाजपमध्ये नक्की डोळ्यांवर पट्टी कोणी बांधली,असा प्रश्न अनुत्तरित आहे.

नेमकी निवडणूक कशी झाली

20 जानेवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती होती. या दोघांनी मिळून भाजपविरोधात ही निवडणूक लढवली. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती कारण आप आणि काँग्रेस इंडिया आघाडीचा घटक म्हणून पहिल्यांदाच भाजपविरोधात निवडणूक लढवत होते. पण या निवडणुकीत आप आणि काँग्रेसच्या एकूण 20 पैकी 8 नगरसेवकांची मतं पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी रद्द केली. त्यामुळे इंडिया आघाडीचा पराभव होऊन भाजपचा विजय झाला होता. यामध्ये भाजपच्या (BJP) जिंकली होती, तर आपच्या उमेदवाराला 12 मतं मिळाली होती, पण मतमोजणीत पीठासीन अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करत 8 मतं बाद ठरवल्याचा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता. यावर आपनं जोरदार आक्षेप घेत थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यानंतर यावर सुनावणी करताना हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम असून, हा गैरप्रकार करणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केली होती.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT