Narendra Modi and A K Mishra 

 

Sarkarnama

विश्लेषण

योगींना डच्चू? मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेत्याचं मोदींच्या निकवर्तीयाकडं बोटं

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकांची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकांची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) निकटवर्ती व विश्वासू माजी सनदी अधिकारी ए.के.शर्मा (A.K.Sharma) यांचे नाव आता पुढे आले आहे. याबाबत भाजपच्या माजी खासदारानेच गौप्यस्फोट केला आहे.

मोदींचे विश्वासू ए.के.शर्मा यांच्यावर उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मोदींनीच मागील वर्षी शर्मा यांना उत्तर प्रदेशात पाठवले होते. माजी सनदी अधिकारी शर्मा हे मोदींचे ते निकटवर्तीय मानले जातात. आता भाजपचे माजी खासदार हरिनारायण राजभर यांनी मिश्रांबाबत मोठा दावा केला आहे. राजभर यांचा हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

शर्मा हे विधान परिषदेचे आमदार असून, ते भाजपचे उपाध्यक्ष आहेत. जाहीर सभेत बोलताना राजभर यांनी म्हटले आहे की, माझे उरलेले आयुष्यभर शर्मा यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी प्रयत्न करीत राहीन. आपण सर्व त्यांच्यासाठी काम करण्याची शपथ घेऊयात. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून शर्मांचे नाव पुढे करावे.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. याचबरोबर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. अनेक नेते उघडपणे योगींच्या विरोधात बोलत आहेत. पक्षात दिवसेंदिवस वाद वाढत आहेत. यातच कोरोना संकट हाताळण्यातील चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशात यावर्षी होणारी विधानसभा निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल.

यावर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, राज्यातील जनतेत सरकारबद्दल असलेल्या नाराजीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा येईल, अशी चर्चा सुरू आहे. योगींना बदललल्यास त्यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी कोण येणार याचीही चर्चा आहे. त्याचवेळी आता शर्मांचे नाव समोर येऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT