Devendra Fadnavis, Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विश्लेषण

गडकरी, फडणवीस अन् बावनकुळेंच्या गडात भाजपला उमेदवार मिळेना? अन् गाणारांच्या नावावर एकमत होईना!

Legislative Council Election : राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

अमोल जायभाये

Legislative Council Election : राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सर्वच राजकीय पक्षांना या जागा खेचून आण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे अजूनही ठरत नाही. दोन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवाराची वाट पाहत आहेत.

विदर्भ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार हे ताकदवर नेते या पट्यातील असूनही भाजपला (BJP) उमेदवारीबाबात विचार करावा लागत आहे. मागील निवडणुकीतही त्यांना शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना पाठिंबा द्यावा लागला होता. पदवीधरच्या निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसला.

भाजपच्या हातुन काँग्रेसने पदवीधरची जागा खेचून आणली होती. त्यामुळे काँग्रेसचा विश्वास वाढला आहे. परंतू त्यांनीही अजून उमेदवार घोषीत केली नाही. भाजपमध्येही शिक्षक परिषदेने घोषित केलेले उमेदवार गाणार यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून एकवाक्यता दिसत नाही. गाणारांशिवाय पर्यायच नाही आणि गाणार १२ वर्ष आमदार राहिलेले आहे. त्यामुळे यावेळी इतरांना संधी द्यावी, असे दोन मतप्रवाह सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे शिर्षस्थ नेत्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहे. गेल्या वर्षी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जशी हार पत्करावी लागली, तसे या निवडणुकीत होऊ नये, म्हणून नेते सावध आहेत.

समजा गाणार यांना पाठिंबा दिला नाही आणि भाजपने स्वतःचा उमेदवार उभा केला. तर पराभव निश्चित आहे, असे म्हणणारा पदाधिकाऱ्यांचा मोठा वर्ग भाजपमध्ये आहे. त्यामुळे गाणार यांना पाठिंबा दिला नाही आणि दुसरा उमेदवार पुढे केला, तर पदवीधरसारखा निकाल लागू शकतो. पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने (Congress) भाजपच्या उमेदवाराचा पार सफाया करून टाकला होता. त्यामुळे भाजपची बालेकिल्यात कोंडी झाल्याची चर्चा आहे.

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने संयुक्त उमेदवार उभे केल आहे. त्यामध्ये आज भारती जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन उमेदवारांची घोषणा केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यामध्ये कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून रणजीत पाटील यांना तर मराठवाडा शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात करण्यात आली आहे.

मात्र, भाजपने नागपूर आणि नाशिकसाठी उमेदवारांची घोषणा केली नाही. नागपूरमध्येच भाजपची कोंडी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. तर यामुळे दुसरीकडे काँग्रेसला बळ मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीची घोळ भाजपला लवकरात लवकर मिटवावा लागणार आहे.

दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रहार शिक्षक संघटना व‎ महाराष्‍ट्र इंग्रजी शाळा संस्‍था संघटनेचे (मेस्टा) पाचही विभागाचे उमेदवार‎ जाहीर केले. त्यामुळे पदवीधर व‎ शिक्षक मतदार संघात भाजप-शिंदे गटाच्‍या विरोधात प्रहार पक्षाने‎ भूमिका घेतली आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT