Bjp Leader Ekanath Khadase Meets NCP Leader Sharad Pawar
Bjp Leader Ekanath Khadase Meets NCP Leader Sharad Pawar 
विश्लेषण

शरद पवार- एकनाथ खडसे यांच्यात अज्ञातस्थळी चर्चा?

राजू सोनवणे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे नाराज नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही. 

गेल्या काही दिवसापासून खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार-खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. काल सकाळी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात भाजपच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या झालेल्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसे अनुपस्थित होते. 

दरम्यान, खडसे यांचा अधिवेशन काळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात आहे. तर हा प्रवेश २० तारखेनंतर जळगावमध्ये होईल, अशीही एक चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT