Raj Thakray - Medha Kulkarni
Raj Thakray - Medha Kulkarni 
विश्लेषण

'या साठी' मेधा कुलकर्णी भेटल्या राज ठाकरेंना!

वैदेही काणेकर / अमोल कविटकर

मुंबई : कोथरुडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे. निवडणुकीच्या आधीची त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, आज आपल्या मुलीच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी त्यांनी राज यांची भेट घेतली. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यावेळीही उमेदवारी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पुण्यातील सेफ मतदारसंघ म्हणून कोथरूड मतदारसंघाची निवड करण्यात आली. त्यामुळे तेथील विद्यमान आमदार  मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. 

आज मेधा कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास 25 मिनिट चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या आधी मेधा कुलकर्णी आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची बाबही पुढे आली होती, आज त्यांनी घेतलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, हा राजकीय विषय नाही. मी माझ्या कन्येच्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. मी सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना कन्येच्या विवाहाचे निमंत्रण देत आहे, असे मेधा कुलकर्णी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT