Raosaheb Danve -Harshvardhan Patil - Chitra wagh - Pankaja Munde  Sarkarnama
विश्लेषण

BJP MLC Election : भाजपचा 'मास्टर प्लॅन'? पंकजा मुंडेंचं पुनर्वसन, पण रावसाहेब दानवे, वाघ,पाटील जानकरांचं काय ?

MLC Election Candidate List Announcement : एकीकडे मुंडे यांचं पुनर्वसन करताना भाजपने चर्चेतील रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील या दिग्गज नेत्यांना वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेतच ठेवलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही धक्कादायक निकालांची नोंद झाली होती. त्यात बीड आणि जालना मतदारसंघाचा समावेश आहे.या ठिकाणी भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. हे दोन्हीही पराभव भाजपच्या फारच जिव्हारी लागले आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला असून पंकजा मुंडे यांना थेट विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. पण एकीकडे मुंडे यांचं पुनर्वसन करताना भाजपने चर्चेतील रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील या दिग्गज नेत्यांना वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेतच ठेवलं आहे.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.यात पंकजा मुंडे(Pankaja Munde) , योगेश टिळेकर,परिणय फुके,अमित गोरखे यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे.पण विधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंना मात्र विधान परिषदेसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून (BJP) पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे.येत्या 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचदिवशी निकालही जाहीर करण्यात येणार आहे. भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करताना सोशल इंजिनिअरींग साधल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर भाजप खडबडून जागं झालं आहे.विधानसभेला सावध पावलं उचलली आहे. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्याउमेदवारीने सोशल इंजिनिअरींग साधला आहे.

बीडमधल्या पराभवानंतर मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घ्यावं,अशी मागणी उचलून धरली होती. अखेर मुंडे समर्थकांच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवताना त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.

विधानसभेला आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फटका बसू नये यासाठीच भाजपकडून घेण्यात आला असल्याचा सांगितलं आहे. विधान परिषदेसाठी ज्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आली आहेत त्यात जातीय समीकरणाचा विचार करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र या तीनही भागांचा विचार करण्यात आला आहे.

जालना लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय केलं जाण्याची शक्यता होती. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यात पाठवलेलं नाही. याऐवजी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाण्याची शक्यता आहे. तर महादेव जानकर विधान परिषद आणि राज्यसभेची जागा दिली जाणार असल्याचा दावा करणाऱ्या जानकरांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही.

पण एकीकडे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केले जात असतानाच दुसरीकडे अडचणीच्या काळात भाजपची बाजू ताकदीने मांडणाऱ्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटलांना पक्षाने सध्यातरी वेट अॅण्ड वॉच या भूमिकेत ठेवलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात या नेत्यांबाबत भाजप पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT