विश्लेषण

भाजपने 'बॅलेट पेपर'वर निवडणूका घेवून दाखवाव्यात :महाराष्ट्रातील नेत्यांचे आव्हान

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येताच भाजपच्या विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनच्या बाबत लोकांमधे संशय असल्याने मतदान पत्रिकेनुसार (बॅलेट पेपर) निवडणूका घेवून दाखवा. असे आवाहन केले आहे.

संजय मिस्कीन : सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येताच भाजपच्या विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनच्या बाबत लोकांमधे संशय असल्याने मतदान पत्रिकेनुसार (बॅलेट पेपर) निवडणूका घेवून दाखवा. असे आवाहन केले आहे.

कर्नाटकमधे स्थानिकांच्या रिपोर्ट नुसार भाजप साठी फारसे अनुकूल वातावरण नव्हते. तरीही भाजपला यश मिळत असल्याबाबत संभ्रम आहे. असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

तर, राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. राज यांनी तर ट्‌विटरवरून "ईव्हीएम चा विजय असो' असे ट्‌विट करत खळबळ उडवली.

तर, उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवन मधे आयोजित पत्रकार परिषदेत कर्नाटक निकालावरून भाजपला टोला लगावला आहे. ईव्हीएमबाबत सर्वांच्या मनात संशय असल्याने भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन तो संशय काढून टाकावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ज्या ठिकाणी पोटनिवडणूका होतात त्यामध्ये भाजपला पराभव पत्करावा लागतो तर निवडणुकांमध्ये विजय होतो. त्यामुळे ईव्हीएम मशिनबाबत सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

या निवडणूकीत ज्यांचा विजय झाला त्याचे अभिनंदन पण जो मुख्यमंत्री होईल त्यांनी मराठी माणसाचा आदर करावा अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT