बीड: "आत्मक्लेश यात्रेच्यावेळी मुुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावले तर हा राजू शेट्टी राज्यपालांना भेटायचा हट्ट धरतो आणि आता शेतकऱ्यांच्या संपावर मुख्यमंत्र्याशी चर्चा करायची म्हणून बोंबलतोय, विरोधकासोबतच तो
राजकारण करतोय'; अशा शब्दांत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अपमान केला.
भाजप सरकारने अडीच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करण्यासाठी रविवारीश्री . हाके बीडमध्ये आले होते.
सरकार कसे पारदर्शी आहे हे पटवून सांगण्यासाठी हाके यांनी तासभर सरकारी योजनांची माहिती पत्रकारांसमोर ठेवली. शेवटी हाके यांची गाडी राजू शेट्टी यांच्यावर येऊन सरकली.
सरकारमध्ये असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा हाके यांनी एकेरी उल्लेख केला. शेतकरी संपाआडून विरोधक करत असलेल्या राजकारणात राजू शेट्टीही सामील असल्याचा आरोप करतांना 'तो राजकारण करतोय 'असा एकेरी उल्लेख हाके यांनी केला.
तत्पुर्वी नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांच्या काळात केलेल्या विविध विकास योजनांचा उहापोह केला. जगात देशाची प्रतिमा उंचावल्याचे सांगत 63 अब्ज डॉलरची गुंतवणूक मेक इन इंडिया अंतर्गत झाल्याचे सांगितले. विकासकामे
करतांना पक्षीय भेद भाजपने कधीच केला नाही. अडीच वर्षांत जलयुक्त शिवार मुळे दोन टक्के सिंचन वाढले असून केंद्राने दिलेल्या 19 हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीतून25 प्रकल्प पुर्ण होऊन त्याद्वारे पंचवीस
टक्क्यांपर्यंत सिंचन वाढेल, असा दावा गणेश हाके यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.