विश्लेषण

भाजपच्या ट्‌वीटर हॅन्डलचा दुरुपयोग 

सरकारनामा ब्युरो

पुणे ::भारतीय जनता पार्टीच्या ट्‌वीटर हॅंडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्‌वीट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते व प्रदेश माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे रविवारी एका तक्रारीतून केली आहे. 

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना यात कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशय आहे. भाजपच्या ट्‌वीटर हॅंडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार त्यांनी सायबर विभागाकडे केली आहे. 

उपाध्ये यांनी तक्रारीत म्हटले आहे, की भाजप महाराष्ट्रचे @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्‌वीटर हॅंडल आहे. भाजपचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हॅंडल वापरतात. रविवार, दि.3 नोव्हेंबर रोजी मेरखेड अथवा अन्य कोणी पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्‌वीट केले नसताना सकाळी सव्वादहा वाजता भाजपच्या सरकारसंदर्भात आक्षेप घेणारे ट्‌वीट प्रसिद्ध झाले. भाजपचे ट्‌वीटर हॅंडल हॅक झाल्याची शक्‍यता दिसत असून या प्रकाराची चौकशी करावी. 


उपाध्ये यांनी चौकशीची मागणी केल्याची माहिती पक्षाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी "सरकारनामा'ला दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT