BMC Election Thackeray VS BJP Sarkarnama
विश्लेषण

Thackeray Brother Strategy : ठाकरे बंधूंच्या मनात काय? मुंबईत ना प्रचाराचा धुरळा ना, आरोपांचा फैरी; 'या' रणनीतीवर जोर

BMC Election Thackeray VS BJP : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका दिसत नाही. तर, भाजपने देखील केंद्रीय मंत्र्यांना प्रचारापासून लांब ठेवले आहे. या मागची रणनीती समोर आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

विनोद राऊत

BMC Election Update : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचा धुव्वा उडताना दिसत नाही.प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाही प्रचारात जोर दिसत नाही. या वेळी युती आणि आघाडीत झाली आहे. तब्बल १९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघेल, आरोप प्रत्यारोपाला धार चढेल, अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र प्रचार शांतपणाने सुरू आहे. मुंबईकर, विशेषतः मराठी माणूस शांत असल्याचे त्रि आहे.

लातूर, पुणे, पिंपरी-चिंचवड नवी मुंबई या महापालिकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, त्या तुलनेत मुंबई शांत आहे.

काँग्रेस,भाजपसह मुख्य पक्षांनी केंद्रीय नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवलेली नाही. ठाकरे बंधू शांतपणे शाखाशाखांना भेटी देत आहेत. राज ठाकरेंची मुलखमैदानी तोफ अजून धडधडताना दिसत नाही. गुजराती विरुद्ध मराठी किवा परप्रांतीय विरुद्ध मराठी अशा वादग्रस्त मुद्यांची राळ उठलेली नाही. मुख्य राजकीय पक्षांचे नेमके काय सुरु आहे, त्यामागचे नियोजन काय आहे, हे समजून घेऊया.

मुंबई पालिकेच्या निवडणुकीत कुठलाच मुद्दा केंद्रस्थानी नाही. या कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्यामुळे तिथे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात त्यामुळे सर्वच पक्ष शांतपणे काम करताना दिसत आहेत. मतदारांच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागताना दिसत नाही. असे मत राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी व्यक्त केले.

ठाकरे बंधू

मोठमोठ्या जाहीर सभांऐवजी शाखा भेटींवर ठाकरे बंधूंचा जोर आहे. मुंबईतील २२७ शाखा आणि प्रचार कार्यालयांना राज, उद्धव ठाकरे, अमित तसेच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे भेटी देत आहेत. रविवारी शिवाजी पार्क येथे एकच जाहीर सभा होणार आहे.

रणनीती

मोठ्या सभा घेऊन वेळ, संसाधन, ताकद खर्च करण्यापेक्षा शाखा भेटी करून कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन यंत्रणा कामी लावणे.

भाजप

हैद्राबाद महापालिका निवडणूक पॅटर्नप्रमाणे या वेळी मुंबईत पंतप्रधान, गृहमंत्री भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री प्रचारत उतरली असे वाटत होते. मात्र. यावेळी राज्यातील काही आमदार, खासदार वगळता मोठे चेहरे प्रचारात दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 12 तारखेला शिवाजी पार्कवर एकमात्र मोठी सभा आहे.

रणनीती

मोठ्या संख्येने केंद्रीय नेते मुंबईत प्रचारात उतरल्यास मुंबई तोडण्याच्या तसेच मराठी माणसाच्या ठाकरे बंधूंच्या मुद्याला हवा मिळू शकते, हे टाळायचे आहे.

शिवसेना शिंदे गट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपासून प्रचार सभा घेत आहेत. याशिवाय नीलेश राणे यांच्यासह मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांशी डोअर-टू-डोअर संपर्क साधत आहेत.

रणनीती

माजी नगरसेवकांच्या वॉर्डावर फोकस

काँग्रेस

उद्धव ठाकरे यांनी मनसेला सोबत घेतल्यामुळे आघाडी तोडली, आता काँग्रेसने या वेळी वंचितला सोबत घेतले आहे. स्थानिक नेते धुरा सांभाळत आहेत.

रणनीती

ठाकरे यांच्यासोबत आघाडी तुटली असली तरी भाजपला फायदा होऊ नये हा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT