CBI
CBI 
विश्लेषण

दाभोलकर यांच्या हत्येचे पिस्तूल  बाळगल्याच्या संशयावरून  तिघांना  एटीएस कडून अटक 

सरकारनामा

औरंगाबाद: डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेले पिस्तूल बाळगल्या प्रकरणी  एटीएसने औरंगाबाद शहरातून तीन जणांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे . अटक करण्यात आलेल्या तिघा जणांविरुद्ध सध्या अवैध शस्त्र  बाळगल्या प्रकरणी आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे  

सचिन अंदुरे याला अटक  केल्यानंतर मुंबईत त्याने सीबीआय आणि एटीएसला दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबईहून आलेल्या  पथकाने औरंगाबादेत मंगळवारी तीन ठिकाणी छापे मारले . चौकशीसाही तिघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले .  


शरद कळसकर आणि  सचिन अंदुरेला अटक केल्यानंतर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सीबीआय आणि एटीएसने औरंगाबाद येथे संयुक्त कारवाई केली. संशयित तरुणाच्या  घरातून तीन जिवंत काडतुस, पिस्टल,  तलवार आणि कट्यार जप्त केल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. 

 या कारवाईत   दोन्ही पथकांनी सचिन अंदुरेचे नातेवाईक असलेले दोन तरुण आणि  आणि त्यांच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एकाच्या  घरातून तीन जिवंत काडतुस, पिस्टल,  तलवार आणि कट्यार जप्त केल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे.  मात्र, संशयित तिघांचा नेमका काय सहभाग होता हे अद्याप एटीएसने स्पष्ट केलेले नाही.  

एटीएसच्या पथकाने धावणी मोहोल्ला  , औरंगपुरा आणि देवळाई भागात छापे टाकले . पोलिसांनी दिवसभर ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना रात्री उशिरा बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली आहे . अटक केलेले तिघेही तरुण महाविद्यालयीन तरुण आहेत. सचिन अंदुरे याने ठेवण्यास दिलेले पिस्तूल आणि इतर शस्त्रे बाळगल्याने या तीन तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे . 

एटीएसचे अधिकारी औरंगाबादेत पकडलेल्या पिस्तूलची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करून हे पिस्तूल नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येच्यावेळी वापरलेले होते काय याचा तपास  करणार आहेत . मात्र औरंगाबादेत पिस्तूल सापडल्याने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याभोवती पुराव्यांचा फास अधिक घट्ट वळला गेला आहे . 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT