विश्लेषण

चौकशी करण्याच्या धमक्‍या कोणाला देता ? : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : स्कूटरवरून फिरणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल कोठून आले? मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे खासगी साखर कारखाना कोठून आला, याचा हिशेब त्यांनी मांडावा, असे आव्हान देत मागच्या पाच वर्षांत मी एक ग्रॅमचा दागिनाही घेतला नाही, तरीही माझी चौकशी करता असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. 

तसेच चौकशी करण्याच्या धमक्‍या कोणाला देता? राज्यात सत्ता नसली म्हणून काही फरक पडत नाही. गाडीचा टायर बदलायच्या आधी सरकार बदलेल. त्या वेळी मात्र तुमच्यावर तोंड लपविण्याची वेळ आणू, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप शहर जिल्हाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT