Uddhav Thackeray-Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

राज्यातील माता-भगिनींना आधार देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री ठाकरे

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

ज्ञानेश सावंत

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. जे जे शक्य आहे, ते ते आम्ही करत राहणार आहोत. हा अर्थसंकल्प राज्यातील माता आणि भगिनींना आधार देणारा आहे. तो जनता स्वीकारेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. (Chief Minister Uddhav Thackeray welcomed the budget presented by Ajit Pawar)

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. कोरोना कमी पडतोय म्हणून की काय, म्हणून संकटे आली, तरीही विकासाची गती कमी होऊ दिलेली नाही, असे सांगून हे सरकार सगळ्या संकटांना तोंड देऊन उभे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सर्व घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार सत्तेत आल्यापासून पहिली दोन वर्षे कोरोनाची साथ होती. याच काळात काही संकटे आली त्यावर मात करून आता कुठे सावरत आहोत. अशा स्थितीतही विकासाची गती कमी होऊ दिलेली नाही. राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.’’

राज्यात ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये रोज नव्या मुद्यावरून संघर्ष झडत आहे. या सरकारच्या अर्थसंकल्पावरून सरकारला घेरण्याची व्यूहरचना विरोधक आखत आहेत. या पुढच्या काळात विशेषत: अधिवेशनच्या शेवटच्या टप्यात अर्थसकंल्पावरून ठाकरे सरकार आणि विरोधी बाकांवरील मंडळींमध्ये सभागृहात जुंपण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत बोलताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनामुळे जगाबरोबरच आपल्यालाही अडचणी आल्या. त्यातून मार्ग काढला. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देणार आहोत, त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भूविकास बॅंकेचे कर्ज असणाऱ्यांना माफी देणार आहोत. त्याचा फायदा ३५ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मार्ग काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा समाधान काढणारा मार्ग काढला जाणार आहे. हप्ते पाडून थकबाकीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT