विश्लेषण

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेची शिष्यवृत्ती दुप्पट 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 6 हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता 12 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. 

केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना सन 2008 पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आतापर्यंत दरवर्षी 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून 4 वेळा देण्यात येत होती आता मात्र दरवर्षी एकाचवेळी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेसाठी घेण्यात येणा-या परीक्षेत किमान 40 टक्के (32 टक्के अजा/अज विद्यार्थ्यांकरिता) गुण असणे आवश्‍यक होते मात्र हि अट आता रद्द करण्यात आली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT