विश्लेषण

मुख्यमंत्र्यांनी गाईची धार काढून शेतकरी असल्याचे सिध्द करावे : धनजंय मुंडे 

सरकारनामा ब्युरो

रावेर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी शेतकरी आहे, त्यांनी गाईची धार काढून ते सिध्द करून दाखवावे असे अवाहन राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे. रावेर येथे जाहिरसभे ते बोलत होते. 

नगर येथून सुरू झालेली हल्लाबोल यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली असून आज रावेर येथे छोरीया मार्केटमध्ये जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, चित्राताई वाघ, सुनिल तटकरे, अरूणभाई गुजराथी, नानासाहेब काळे, दिलीप वळसेपाटील, 
भास्करराव जाधव,डॉ. सतिष पाटील आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलतांना धनजंय मुंडे म्हणाले, राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी झालेली नाही, कापूस उत्पादकांना बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता गारपिटीचे संकट आले आहे. त्यांच्या पंचनाम्यासाठी सरकार वेगळ्याच अटी घालत आहे. त्यामुळे शेतकारी पुर्ण हतबल झालेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मी शेतकरी आहे, ते शेतकरी असतील तर त्यांनी गाईची धार काढून ते सिध्द करून दाखवावे. राज्यातील जनतेच्या प्रश्‍नासाठी "हल्लाबोल यात्रा'काढण्यात आलेली आहे. राज्यभरात ही यात्रा काढण्यात आली असून ती संपेल तेंव्हा हे सरकार कोसळेल. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT