विश्लेषण

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची खलबतं सुरूच 

सरकारनामा ब्युरो

पुणे - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील बैठकीत सत्ता स्थापन करण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र, बैठकीतील चर्चांविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

ठरल्याप्रमाणे आज दुपारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल मुंबईत दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यासाठी कॉंग्रेस अनुकूल नव्हती. त्यामुळे काल शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कॉंग्रेसचे पत्र मिळू शकले नाही. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला 24 तासांची मुदत दिली. मात्र, आज दुपारी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. 

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील खलबतं दुपारी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपाची राष्ट्रवादीने बैठकीत अपेक्षा व्यक्त केल्याचे समजते. त्याचबरोबर कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याएेवजी सत्तेत सहभागी होण्याबरोबरच किमान समान कार्यक्रमावरही चर्चा झाल्याचे कळते.

शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याचे कारण सांगत सर्वोच्च न्यायालयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णायाविरोदात याचिका दाखल केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT