congress leader shashi tharoor says something special is happening
congress leader shashi tharoor says something special is happening 
विश्लेषण

शशी थरुर म्हणाले, आज काही तरी विशेष घडताना दिसतंय!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस (Congresss) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्ष (Opposition Parties) केंद्र सरकारच्या विरोधात एकवटले. यामुळे आगामी काळात राहुल गांधी हे विरोधी पक्षांचे नेतृत्व करताना दिसतील, असे चित्र आहे. याकडे काँग्रेस नेते शशी थरुर यांनी लक्ष वेधले आहे. 

शशी थरुर यांनी म्हटले आहे की, नाश्त्याच्या बैठकीला 11 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी संसदेतील एकतेबद्दल भूमिका मांडली. भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि जनतेविरोधी धोरणांचा विरोध मैदानात उतरून करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपण काही तरी विशेष घडताना पाहत आहोत. 

राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात 14 विरोधी पक्षांची बैठक घेतली होती. मागील आठवड्यातच त्यांनी संसदेत थेट ट्रॅक्टर घेऊन येऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. आज विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांनी नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षनेते इंधन दरवाढीचा निषेध करीत सायकलवरुन संसदेत पोचले. विरोधी पक्षांची एकजूट झाल्याने केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

पेगॅसस प्रकरणाचा भूतं केंद्र सरकारची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संसदेत विरोधी खासदारांकडून पेगॅससच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. पण सरकारचा नकार असल्यानं कोंडी निर्माण झाली आहे.

पेगॅससच्या मुद्यावरून ते आक्रमक झाले असून सातत्यानं ट्विटरवरून सरकारवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे, पेगॅससच्या संभाव्य हेरगिरीच्या यादीत त्यांचे व निकटवर्तींयांचे मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झालं असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्याने सरकारकडून अधिवेशन गुंडाळले जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेसह राज्यसभेतही विरोधकांनी पेगॅससवरून रान पेटवलं आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT