विश्लेषण

दानवे आणि भावना गवळी हे राज्यातील `सिनिअरमोस्ट` लोकसभा खासदार; 19 नवे चेहरे

स्वरूप जानकर

पुणे : महाराष्ट्रातून सर्वात सिनिअर खासदार म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचे रावसाहेब दानवे आणि यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी यांचा क्रमांक लागला आहे. दोघेही सलग 1999 पासून लोकसभेवर निवडून येत आहेत.

राज्यातून सलग चार वेळा निवडून आलेल्यांमध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव आणि अकोल्याचे संजय धोत्रे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि उदयनराजे भोसले यांनी लोकसभेतील खासदारकीची हॅटट्रीक नोंदवली आहे. 

दोन वेळा निवडून आलेल्यांमध्ये 23 जणांचा समावेश आहे. यात डाॅ. हीना गावीत, सुभाष भामरे (धुळे), रक्षा खडसे , रामदास तडस आणि कृपाल तुमाणे, नितीन गडकरी, अशोक नेते, संजय जाधव, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, गोपाळ शेट्टी, गजानन किर्तीकर, पूनम महाजन, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, सदाशिवराव लोखंडे, प्रीतम मुंडे, संजय पाटील आणि विनायक राऊत यांची नावे आहेत.

पहिल्यांदा निवडून आलेले खासदार (19) : गिरीश बापट,  उन्मेष पाटील, नवनीत राणा, सुनील मेंढे, बाळू धानोरकर, हेमंत पाटील, प्रताप चिखलीकर, इमिआज जलील, भारती पवार, मनोज कोटक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सुजय विखे, ओमराजे निंबाळकर, रणजित निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामी, सुधाकर शृंगारे, सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे


विद्यमान विधानसभेतील सहा आमदार हे आता खासदार म्हणू संसदेत दिसणार आहेत. यात प्रताप पाटील चिखलीकर, गिरीश बापट,  इम्तीयाज जलील, बाळू धानोरकर, उन्मेष पाटील आणि हेमंत पाटील 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT