विश्लेषण

नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी 

सरकारनामा ब्युरो

नाशिक ः विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले. त्यांना 388 मते मिळाली. त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे ऍड. शिवाजी सहाणे यांचा पराभव झाला.

सहाने यांना भाजप, मनसे आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांनी पाठींबा दिला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात या निवडणुकीत मतदारांची सामाजिक विभागणी झाल्याने सर्वच पक्षांच्या मतांत फुट पडल्याचे मतमोजणीत स्पष्ट झाले. 

सोमवारी (ता.21) मतदान झाले. आज (ता. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी झाली. प्रशासनाने मतमोजणीचे प्रात्यक्षिक घेतले. जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर 644 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शंभर टक्के मतदान झाले होते. शिवसेनेने या निवडणुकीत सर्व पक्षांनी आघाडी केली असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकहाती पराभव केला. त्यामुळे हा निकाल चर्चेचा विषय ठरला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT