Desecration of Monuments will be Dealt with Atrocity Act in Mumbai
Desecration of Monuments will be Dealt with Atrocity Act in Mumbai 
विश्लेषण

पुतळे, स्मारकांची विटंबना करणाऱ्यांविरोधात अ‍ॅट्राॅसिटीच्या धर्तीवर होणार कारवाई

रामनाथ दवणे

मुंबई : मुंबईत सध्या राष्ट्रीय स्मारके,राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे तसेच भारताचे संविधान यांच्या कोणत्याही प्रकारे अवमान करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याच्या धर्तीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. ठरावाच्या सूचनेद्वारे केलेली मागणी सभागृहात मंजूर करून महापौरांनी पुढील अभिप्रायसाठी आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देश विभागाला दिले.

गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवर अतिशय काळजीपूर्वक आणि पुरेशा दक्षतेने या पुरातन वास्तूंचे जतन करण्यात येते. तसेच जगातील सर्वांत मोठी आणि सशक्त लोकशाही हे बिरुद सार्थ करणार्‍या भारत देशाचे संविधान हे एकमेव द्वितीय, असे लिखित संविधान आहे. परंतु, काही वेळा समाजविघातक प्रवृत्ती, भारताचे संविधान, राष्ट्ध्वज, इत्यादींचा अवमान करणारे निंदनीय कृत्य करतात. त्यामुळे देशातील शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. इतकेच नव्हे तर जातीय तसेच धार्मिक विद्वेष पसरुन, जनसामान्यांच्या जीविताला व मालमत्तेस तसेच राष्ट्रीय संपत्तीस हानी संभवते. 

परिणामी वैश्विक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने , राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे तसेच भारताचे संविधान यांच्या कोणत्याही प्रकारे अवमान करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याच्या धर्तीवर अजामीनपात्र गुन्हा करण्यासाठी एक स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वार केली आहे. भारत देशास विविध परंपरा, रुढी आणि उच्च सांस्कृतिक वारसा लाभला असून त्यांची श्रीमंती कथित करणारे राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे आणि राष्ट्रीय स्मारके यांच्यासारख्या अनेक ऐतिहासिक पुरातन वास्तू भारताच्या मर्मबंधातील ठेवी असल्याचे जाधव यांनी नमुद केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT