Chandrakant Patil Ajit Pawar Devendra Fadanavis Girish Mahajan
Chandrakant Patil Ajit Pawar Devendra Fadanavis Girish Mahajan 
विश्लेषण

...आणि फडणवीसांचे ट्वीटर स्टेटस् पुन्हा बदलले! ते पुन्हा आले, तर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातले दैनंदिन व्यवहार सुरु असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही फडणवीस यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतल असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस व पवार यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात शिवसेनेबरोबर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करेल, अशी शक्यता ती. त्यांच्या चर्चांच्या फेऱ्याही सुरु होत्या. तेवढ्यात हा राजकीय भूकंप झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT