विश्लेषण

भारत भालके यांच्या घरी जाणार मुख्यमंत्री 

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : मराठा समाजातील काही आंदोलकांनी गेल्या वेळी पंढरपुराचे दरवाजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बंद ठेवल्यानंतर यावर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे नेते विठूरायाचरणी लीन होण्यासाठी कुटुंबकबिल्यासह जाणार आहेत.

फडणवीस यांनी बेरजेच्या राजकारणाचा नवा अध्याय वारीनिमित्त सुरू केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांना समवेत नेणारे फडणवीस या वारीत आमदार भारत भालके यांच्या घरीही जाणार असल्याचे समजते. भालके यांनी गेल्या वर्षी फडणवीस यांनी पंढरपुरात येवू नये असे सांगितले होते. फडणवीस पंढरपुरात गेल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांकडेही आवर्जून जात असतात. या वेळी या यादीत भालके यांची भर पडणार आहे. भालके यांची गेल्या काही दिवसांत भाजपशी जवळीक वाढली आहे. ते पुढे काय करतात याबददल उत्सुकता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT