VINAYAK_METHE_FADANVIS_
VINAYAK_METHE_FADANVIS_ 
विश्लेषण

फडणवीसांनी मेटेंना सांगितले, विरोध करणाऱ्यांना जनता जागा दाखवते

दत्ता देशमुख

बीड : लोकसभा निवडणूकीमध्ये ज्यांनी विरोध केला ते विरोधीपक्ष नेते असोत अथवा घटक पक्षातील नेते असोत, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना लगावला.

विशेष म्हणजे सोमवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंकडून महाजनादेश यात्रेचे स्वागत स्विकारले होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेचे सोमवारी शिवसंग्रातर्फे आमदार विनायक मेटे यांनी स्वागत केले. श्री. मेटे यात्रेच्या रथावर चढून श्री. फडणवीस यांच्या स्वागतानंतर भाषण करत असतानाच रथातील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे निघून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सभेत भाषणातूनही नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत ‘लोकसभेला विरोध करणाऱ्या घटकपक्षाच्या नेत्यांना तुम्ही बळ देत आहात का’ या प्रश्नावर श्री. फडणवीस यांनी वरिल उत्तर दिले. 

पुढच्या काही दिवसात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही यात्रेचे स्वागत करणार आहेत. ते स्वागत आम्ही स्विकारणार आहोत अशी पुष्टीही त्यांनी जोडली. स्थानिक भाजप नेते व शिवसंग्रामच्या संघर्षाबाबत हा संघर्ष संपेल असे उत्तरही देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी तो कसा संपेल असा प्रश्न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT