विश्लेषण

धुळ्याच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार बिनविरोध 

सरकारनामा ब्युरो

धुळे : भाजपचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर नगरसेविका कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 74 पैकी 50 जागा जिंकत भाजपने महापालिकेवर सत्ता मिळवली होती. या  विजयानंतर आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार पीठासीन अधिकारी होते, आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते. महापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याची घोषणा करत अधिकृतरित्या उमेदवारी मागे घेतली. शहर विकासासाठी जनतेने भाजपला कौल दिला असल्याचे म्हणत उमेदवारी माघार घेत असल्याचे व भाजपला पाठिंबा देत असल्याचे गटनेते कमलेश देवरे यांनी सांगितले

त्यामुळे त्यामुळे भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.उपमहापौर पदासाठीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याने भाजपच्या कल्याणी अंपळकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर भाजपने घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT