Digvijay-Imran-Siddhu
Digvijay-Imran-Siddhu 
विश्लेषण

सिद्धूजी, तुमचे मित्र इम्रानभाईंना समजावा : दिग्विजयसिंहांचा घरचा आहेर 

सरकारनामा

नवी दिल्ली : " सिद्धूजी, तुमचे मित्र इम्रानभाईंना समजावा ,   त्यांच्याच मुळे तुम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत. 
भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासही तुमच्या मित्राला सांगा," अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 
दिग्विजयसिंह यांनी नवज्योत सिद्धू  यांना घरचा आहेर दिला आहे . 

पंजाब मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल  देशभरात पाकिस्तान विरुद्ध जनक्षोभ उसळलेला असताना पाकिस्तानची बाजू घेतली होती . त्या भूमिकेपासून माघार घेण्यास सिद्धू तयार नसल्याने त्यांच्या विरुद्ध  देशभरात टीकेची झोड उठलेली आहे . पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी आणि एका मंत्र्यानेही सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे . 

आता दिग्विजयसिंह यांची त्यात भर पडली आहे . त्यांनी आज काश्मीरबाबत अनेक ट्विट केले आहेत . एका ट्विटमध्ये दिग्विजयसिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान संदेश पाठवला आहे .

त्यात ते म्हणतात ,"  इम्रान खानजी जरा धाडस दाखवा आणि हाफीज सईद आणि मसूद अझहर या दहशतवाद्याना भारताच्या हवाली करा . तुम्ही असे केले तर पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर पडेल आणि तुमचे  नाव नोबेल शांता पुरस्कारासासाठी आघाडीवर राहील . " 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT