Donald Trump  Sarkarnama
विश्लेषण

Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘ही’ 5 कारणे ठरली आत्मघातकी; भारत-पाक संघर्षही कारणीभूत...

Donald Trump’s Nobel Peace Prize Controversy : डोनाल्ड ट्रम्प हे सात युध्द थांबविल्याची शेखी मिरवत असले तरी नोबेलसाठी तेवढे पुरेसे नव्हते. दोन देशांमधील युध्द थांबले म्हणजे त्यांच्यात यापुढे युध्द होणार नाही, याची शाश्वती असणे आवश्यक आहे

Rajanand More

How Trump’s Foreign Policy Backfired Internationally : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर काही महिन्यांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी फिल्डींग लावली होती. आतापर्यंत मी जगातील सात युध्द थांबवली, आठवेही थांबवणार असल्याचे सांगत त्यांनी नोबेलसाठी आपणच सर्वाधिक योग्य दावेदार असल्याची टिमकी ते वाजवत होते. इस्त्रायलसह पाकिस्ताननेही त्यांना उघड पाठिंबा दिला होता. पण ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी घेतलेले काही निर्णयच आत्मघातकी ठरले आहेत.

व्हेनेजुएलातील प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचे शांततेचे नोबेल जाहीर झाले आहे. आयर्न लेडी म्हणून ओळख असलेल्या मारिया यांचे शांततेसाठी काम ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ ठरले आहे. ट्रम्प यांच्याकडून सात युध्द थांबविल्याचा दावा केला जात असलेल्या या युध्दांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघर्षाचाही समावेश आहे.

कोणती आहे पाच कारणे?

ट्रम्प हे सात युध्द थांबविल्याची शेखी मिरवत असले तरी नोबेलसाठी तेवढे पुरेसे नव्हते. दोन देशांमधील युध्द थांबले म्हणजे त्यांच्यात यापुढे युध्द होणार नाही, याची शाश्वती असणे आवश्यक आहे. पण ट्रम्प यांच्या मध्यस्थीतून ते सिध्द झालेले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष त्याचेच उदाहरण आहे. आजही दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले आहेत. एक ठिणगीही दोन्ही देशांमध्ये युध्दाचा भडका उडवू शकते.

दुसरे कारण म्हणजे ट्रम्प यांनी सुरू केलेले टेरिफ वॉर. अनेक देशांवर ट्रम्प यांनी प्रचंड टेरिफ लादत त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू केले होते. उदाहरण द्यायचे झाले तर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, यासाठी ट्रम्प यांनी भारतावर 51 टक्के टेरिफ लादले. इतर देशांच्या बाबतीतही ट्रम्प यांनी हीच भूमिका घेतली होती. जगातील विविध देशांतील परस्पर संबंध अधिक मैत्रीपूर्ण व्हावे, या भूमिकेविरोधात ट्रम्प यांची नीती होती.

रशियाचे यूक्रेनविरोधातील युध्द थांबविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यासाठी सुरू केलेले प्रयत्नही नोबेलसाठी साधा विचारही न करण्यास कारणीभूत ठरले आहेत. रशिया आणि युक्रेनदरम्यान अजूनही संघर्ष धुमसत आहे. दोन्ही देशांमध्य अंतिम तोडगा निघालेला नाही.

इस्त्रायल आणि हमासमधील युध्द थांबविण्यासाठीही ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. गाझा येथे युध्दविराम व्हावा यासाठी शांतता प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. पण अद्याप त्यातील अटी-शर्थी पूर्णत्वाला आलेल्या नाहीत. नोबेल पुरस्काराबाबतचा निर्णय होईपर्यंत त्यावर अंतिम तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळेही ट्रम्प यांचा विचार झाला नाही.

राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि 2015 च्या पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला. हे दोन निर्णयही त्यांच्याविरोधात गेल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक्ष क्षेत्रामध्ये त्यांचे भरीव योगदान असणे अपेक्षित आहे. मात्र, हे दोन निर्णय नोबेलसाठी निकषांच्या विपरीत ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT