विश्लेषण

dysp भाग्यश्री नवटाके यांच्या व्हारयल व्हिडिओने खळबळ

सरकारनामा ब्यूरो

पुणे : माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांचा वादग्रस्त विधानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी अनुसूचित जमाती आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या व्हिडीओत त्यांनी आपली फुशारकी मारताना मुस्लिम आणि दलितांवर कसे खोटे गुन्हे दाखल करत होतो, असे वक्तव्य केले आहे. मी दलितांना हातपाय बांधून मारते. आजपर्यंत २१ दलितांना फोडून काढले आहे. मी त्यांना खोट्या केसमध्ये अडकवते, असे म्हटले आहे.

या व्हिडीओ सर्व मानवाधिकार आणि दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  या व्हिडीओत छेडछाड केल्याचा दावा नवटाके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. नवटाके यांनी तेथील अवैध धंद्याच्याविरोधात कठोर कारवाई सुरू केल्याने त्यांना अडकविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असाही सवाल विचारला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT