ex mumbai cp parambir singh aid predicted anil deshmukh arrest in march
ex mumbai cp parambir singh aid predicted anil deshmukh arrest in march 
विश्लेषण

सीबीआयची एंट्री अन् गृहमंत्र्यांची विकेट पडणार! परमबीरसिंह यांच्या निकटवर्तीयाला मार्चमध्येच माहिती

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Ex Mumbai CP Parambirsingh)  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांच्याविरोधात आता खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक झालेला व्यापारी संजय पुनामिया (Sanjay Punamia) हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असून, त्याने मार्चमध्ये केलेली भविष्यवाणी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी आपल्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी परमबीर सिंग व अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परमबीरसिंह, उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोकरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील यांच्यासह सुनील जैन आणि संजय पुनामिया या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुनामिया हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असल्याचे मानले जाते. खंडणी प्रकरणातील तक्रारदार अग्रवाल आणि आरोपी पुनमिया हे दोघे भागीदार होते. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी यावर्षी मार्च महिन्यात एक बैठक झाली होती. सुमारे साडेतीन चाललेली ही बैठक अग्रवाल यांनी टेप केली होती. तीच आता या तक्रारीचा आधार आहे. पुनामियाने त्यावेळी म्हटले होते की, ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्रातील मंत्र्याची विकेट पाडण्यास सांगितले असून, त्यानंतर केंद्रीय यंत्रणा मुंबईत येऊन तपास सुरू करतील. 

पुनामियाच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. पेन ड्राईव्हमध्ये तीन आणि दोन तासांचे संभाषण सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने परमबीरसिंहांनाही अटक होऊ शकते. आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकेपासून बचाव करण्यात परमबीरसिंग यांना यश आले आहे. या गुन्ह्यात मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT