विश्लेषण

नाणार रद्द करण्याचे सूतोवाच करत CM नी जोडला युतीचा धागा : विधानसभेसाठी 50-50

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची घोषणा करताना त्यांनी ही भूमिका जाहीर केली. व्यापक आणि राष्ट्रीय हितासाठी युती होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेसाठी निम्म्या-निम्म्या म्हणजे प्रत्येकी 144 जागांवर दोन्ही पक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहेत. 

फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

-मुंबईतील नागरिकांना 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात येईल

-नाणार प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल

-तांत्रिक करण किंवा बँकांच्या धोरणामुळे कर्जमाफी पासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांकंग आढावा घेत तत्काळ कर्जमाफी मिळून दिली जाईल

-कृषी विकास केंद्राच्या ठिकाणी पीक विमा संदर्भात तक्रार नोंदवून घेऊन प्रश्न सोडवला जाईल

-राष्ट्रीय विचारांचे पक्ष एकत्र यावे यासाठी आम्ही एकत्र येत आहोत

-लोकसभा, विधानसभा आणि सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची निर्णय घेतला आहे

-सत्ता, पद यासाठी नाही तर वैचारिक भूमिकेसाठी एकत्र येत आहोत

-उद्धव ठाकरे यांनी शेतकरी,सामान्य नागरिकांचे हित ही भूमिका पुढे करत एकत्र येत आहोत

-श्रीरामाचे मंदिर उभे राहिले पाहिजे यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहे

-केंद्र सरकरने 63 एकर जमीन न्यासाला देत मंदिर उभारणीला मार्ग सुकर केला आहे

-प्रभू श्रीराम मंदिर हा आमच्यातील धागा आहे

-शेतकऱ्यांच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे यांनी आग्रह ठेवला आहे

 -शेतकरी काही तांत्रिक कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिले. ही कारणे दूर केल्या जातील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT