Ajit Pawar - Jayant Patil - Chagan Bhujbal
Ajit Pawar - Jayant Patil - Chagan Bhujbal 
विश्लेषण

राष्ट्रवादीचे 'हे' पाच नेते करणार काँग्रेसशी चर्चा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातल्या सत्ता समीकरणासाठी व पुढील गणिते जुळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात प्रथम राज्य पातळीवर चर्चा होणार आहे. या साठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नेत्यांची समिती नेमली आहे. 

राज्यात राष्टपती राजवट लागू झाल्यानंतर आता त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मुंबईत झाली. नुकतीच ही बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. "बाळासाहेब थोरात जयंत पाटील हे प्रथम चर्चा करतील, कुणी सहभागी व्हावे, समान कार्यक्रम काय असावा, यावर आम्ही चर्चा करणार. मग हायकमांडला याची माहिती देणार आहोत. ही एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग पुढील निर्णय घेतला जाईल.'' असे अजित पवार यांनी बैठकीच्या सुरूवातीला पत्रकारांना सांगितले होते. 

त्यानुसार आता काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्याकरीता पाच नेत्यांची समिती नेमण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार, छगन भुजबळ तसेच धनंजय मुंडे,  नवाब मलिक यांचा या समितीत समावेश आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटप व अन्य बाबींवर एकमत झाल्यानंतर मग शिवसेनेशी चर्चा केली जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT