gaps between two doses of covishield may be reduced 
विश्लेषण

मोठी बातमी : कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर होणार कमी

केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले होते. हे अंतर हे पुन्हा कमी करण्यात येणार आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील (Dose) अंतर वाढवले होते. हे अंतर हे पुन्हा कमी करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

कोरोना लसीकरण जानेवारीत सुरू झाले त्यावेळी कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर सुरवातीला 4 ते 6 आठवडे होते. नंतर हे अंतर 6 ते 8 आठवडे करण्यात आले होते. केंद्र सरकारने मे महिन्यात हे अंतर 12 ते 16 आठवडे केले. सरकारने हे अंतर वाढवल्याचा संबंध लशीच्या टंचाईशी जोडला जात होता. अंतर वाढवण्यामागील शास्त्रीय कारणांची विचारणाही केली जात होती. 

लसीकरणासंदर्भात स्थापन केलेल्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीतील काही सदस्यांनीही सरकारने याबाबत विश्वासात घेतले नव्हते, अशी टीका केली होती. अखेर सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अंतर नेमके किती कमी करावयाचे याचा निर्णय समिती लवकरच घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी समितीचे प्रमुख डॉ. एन.के.अरोरा यांनी याबाबत संकेत दिले होते. 

जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे.  आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT