Gopichand Padlkar-Sanjay Raut
Gopichand Padlkar-Sanjay Raut sarkarnama
विश्लेषण

परदेशातील त्या बैठकीचा पर्दाफाश होण्याच्या भीतीने राऊत झिंगाट झालेत : पडळकर

सरकारनामा ब्यूरो

पुणे : जनाब संजय राऊत (sanjay raut) हे देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भीतीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील, त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं आहे, अशा शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Gopichand Padalkar criticizes Sanjay Raut over wine sales license)

किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर केली होती. त्याला आमदार पडळकर यांनी उत्तर दिले आहे.

पडळकर म्हणाले की, जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावंच्या गावं अंधारात लोटली गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. जर खरोखरंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का तुम्ही? की फक्त महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच ही विक्रीची परवानगी असणार आहे. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही.

शरदचंद्र पवार यांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे, त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूणपिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत, असाही दावा पडळकर यांनी केला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

वाईनविक्रीबाबतचा निर्णय कुणाच्या हितासाठी घेण्यात आला आहे. काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. पण, हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही. काहींनी दारूच्या कंपन्या किंवा एजन्सी नव्याने घेतल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. हा निर्णय अशा लोकांच्या भल्याकरताच घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती बैठक कुठे झाली? विदेशात झाली का? असाही प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. हा काही साधासुधा निर्णय नाही, तर याच्यामागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचं स्वप्न या सरकारचं दिसत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी वाईनविक्री परवानगीच्या निर्णयानंतर म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT