अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) गुरुवारी भाजपची (BJP) सत्ता असलेल्या अहमदाबाद (Ahmedabad) महानगरपालिकेला चांगलंच फटकारलं आहे. महापालिकने काही दिवसांपूर्वी रस्त्यावर मांसाहारी पदार्थांचे स्टॉल हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात स्टॉलधारक न्यायालयात गेले आहे. त्यावर उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही लोकांचा अहंकार जपण्यासाठी असे निर्णय घेऊ नका, असं महापालिकेला सुनावलं आहे.
महापालिकेने कारवाई सुरू केली असून 25 जणांचे स्टॉल्स जप्त केले आहेत. स्टॉलमालकांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश विरेन वैष्णव यांनी महापालिकेला खडसावलं आहे. कोणत्याही राजकीय दबावाखाली अशी कारवाई करू नका. आज एखाद्याला स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही लोकांना काहीही विकण्यापासून रोखणार. काही लोकांचे अहंकार जपण्यासाठी असं करू नका, अशा शब्दांत न्यायालयाने महापालिकेला सुनावलं आहे.
सत्तेत असलेला पक्ष म्हणतो, तुम्ही अंडी खाऊ नका. तुम्ही त्यांना थांबवू इच्छिता. तुम्ही त्यांना बाजूला करणार आहात. तुम्ही हे का करत आहात, असा सवाल न्यायलयाने केला. महापालिकेकडून ही कारवाई केवळ मांसाहारी पदार्थ विकणाऱ्यांविरोधात नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
वाहतुक, पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे बेकायदेशी स्टॉल्स हलवले जात आहेत. ही याचिका गैरसमजातून दाखल करण्यात आली आहे. मांसाहारी स्टॉल हटवण्याची कोणतीही मोहि नाही, असं महापालिकेच्या वकिलांनी सांगितलं. त्यावर न्यायाधीश वैष्णव म्हणाले, तिथे अतिक्रमण असेल तर जरूर कारवाई करा. हा तुमचा अधिकार आहे. पण आज सकाळी कुणाला वाटलं की मला हे नको आहे, त्यावरून कारवाई करू नका, असं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
अहमदाबादसह भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमधील अन्य काही महापालिकांनीही अशी कारवाई सुरू केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडूनच मागणी केली जात असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. पण गुजरात सरकारने लोकांवर कोणंतही बंधन नसल्याचे म्हटले आहे. लोकांनी काय खावं, यावर सरकारला काही अडचण नाही, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.