विश्लेषण

हज यात्रेकरूंच्या तिकिटांवर जी एस टी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार: रामदास आठवले 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : हज यात्रेकरूंच्या विमान प्रवासावरील जीएसटी 18 टक्‍क्‍यांहून कमी करून 5 टक्के करण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले. 

हजयात्रेकरूंच्या विमानप्रवासावरील जीएसटी 18 टक्‍क्‍यांऐवजी 5 टक्के करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आठवले यांची संविधान बंगला बांद्रा येथे भेट घेऊन दिले. या शिष्टमंडळात रिपाइंचे प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष जमाल अन्सारी, महाराष्ट्‍रर संघटक सचिव मौलाना अब्दूर रशीद अन्सारी ; उपाध्यक्ष अश्रफ मोमीन, महाराष्ट्‍रर सचिव कलाम शेख ; भिवंडी अल्पसंख्यांक अध्यक्ष गुलाम मोमीन आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT