Ncp Incoming news mumbai
Ncp Incoming news mumbai 
विश्लेषण

औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घरवापसी..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः सिल्लोड तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले होते. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता त्यांची घरवापसी झाली आहे. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सिल्लोड तालुक्यातील ३५ भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांचा आज मुंबईत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून घेतला. भाजपने मात्र आमचा कुठलाही मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीत गेलेला नाही, जे पुर्वी राष्ट्रवादीत होते आणि भाजपमध्ये आले होते, तेच पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीत गेले असल्याचा दावा केला आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप व इतर पक्षात गेलेल्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रेवश देण्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला होता. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील याबाबत सुतोवाच केले होते. अद्याप राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मोठ्या नेत्याची किंवा पदाधिकाऱ्याची घरवापसी झाली नसली तरी छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांपासून याची सुरूवात झाली आहे.

सिल्लोड तालुक्यातील ३५ हून अधिक भाजप व काही बचत गटांच्या महिलांनी आज राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या हस्ते हा प्रवेश झाला. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

आज प्रवेश झालेल्यांमध्ये भाजपचे माजी उपसभापती (पंचायत समिती) रमेश चिंचपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष (भाजयुमो) अंकुश पाटील, अॅड. योगेश रहुडकर, बचतगट समूह अध्यक्षा सविता पाटील, जाफर शाह, पांडूरंग तायडे आदींचा समावेश आहे.  यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस रंगनाथ नाना काळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT