Yavatmal Shivsena Workers Met Hyederabad Police Chief V C Sajjanar
Yavatmal Shivsena Workers Met Hyederabad Police Chief V C Sajjanar 
विश्लेषण

शिवसेनाप्रमुखांचे नाव ऐकताच मिळाली 'एनकाऊंटर मॅन'च्या भेटीची परवानगी

सरकारनामा ब्युरो

यवतमाळ  : 'आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत. 'एनकाऊंटर मॅन'चे अभिनंदन करायचे आहे. त्यांची भेट घालून द्या', अशी विनंती अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांना केली. मात्र, उपयोग झाला नाही. जेव्हा आम्ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, अशी ओळख सांगितली, तेव्हा हैदराबाद येथील पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी भेटण्याची परवानगी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा असलेला आदर बघून आमचा ऊर अभिमानाने भरून आला,'' अशी माहिती शिवसेनेचे यवतमाळ उपशहर प्रमुख गिरीश व्यास यांनी व्यक्त येथे दिली.

हैदराबाद येथील डॉक्‍टर तरुणीवर चार नराधमांनी अत्याचार करून तिला जीवंत जाळल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. त्या नराधमांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत होती. दरम्यान, तेलंगणा पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये त्या चारही नराधमांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. ही कारवाई सायबराबाद येथील पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांच्या नेतृत्वात पार पडली. त्यामुळे सज्जनार 'एनकाउंटर मॅन' म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचे महिलांनी राखी बांधून अभिनंदन केले. सोशल मीडियावर कौतुक झाले. 

यवतमाळच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रातील मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त सज्जनार यांची भेट घेण्याचे ठरविले. त्यांनी तेलंगणा तर गाठले, मात्र मात्र, त्यांची भेट होणे कठीणच. कायद्याच्या दृष्टीने एनकाऊंटरची चौकशी केली जात आहे. सज्जानार यांची भेट घेण्यासाठी पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांना साकडे घातले. मात्र, नकारच मिळाला. अखेर आम्ही महाराष्ट्रातून शिवसेनेचा निरोप घेऊन आलो, असे सांगितले. हाच निरोप सज्जनार यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी भेटीसाठी बोलावून घेतले.

यवतमाळ शिवसेनेचे उपशहर प्रमुख गिरीश व्यास, चेतन सिरसाठ, दीपक सुकळकर, चेतन जगताप, दीपक सुकळकर व श्रीकृष्ण बुरेवार यांनी प्रत्यक्ष सज्जनार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. कौतुकाचा वर्षावही केला. पोलिस आयुक्त सज्जनार यांनी मुंबईत काही काळ सेवा केली असून आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगितले. शिवसैनिकांनी अभिनंदन करीत संवादही साधला.

पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

हैदराबाद येथील पीडित डॉक्‍टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शिवसैनिकांनी सांत्वन केले. त्याच दिवशी दशक्रियाविधीचा कार्यक्रम होता. तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांतून अश्रू बघून आम्हीही अश्रू रोखू शकलो नाही, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT