विश्लेषण

`कर्जत-जामखेडचा विकासाचा अनुशेष भरून काढणार'

सरकारनामा ब्युरो

नगर : `` कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेती उजाड झाली आहे. या परिसरातील जमीन चांगली असून, त्याला फक्त पाण्याची जोड देण्याची गरज आहे. या परिसरातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठीच या मतदारसंघाची निवड केली आहे,`` असे मत युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले.

जामखेड येथील कार्य़कर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, ``या मतदारसंघात काम करण्याची मोठी संधी आहे. वर्षानुवर्षे प्रश्न तेच आहेत. पाण्याचा प्रश्न बिकट असून, टॅंकर अद्यापही बंद झाले नाहीत, ही भयाण परिस्थिती बदलण्याची गरज आहे. या परिसरात औद्योगिक वसाहतीची गरज आहे. त्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होईल. बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.``

रोहित पवार हेच उमेदवार
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या मतदारसंघात रोहित पवार हेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार असतील, असा पुनरुच्चार केला. विकासकामांची मोटी तूट भरून काढण्यासाठीच त्यांनी हा मतदारसंघ निवडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT