Pakistan Border Sarkarnama
विश्लेषण

New country formation : 1971ची पुनरावृत्ती शक्य? मोठं काही घडल्यास जगात आणखी एका देशाची पडेल भर...

1971 war repeat News : सध्य परिस्थितीत भारताने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानची कोंडी केली आहे. ताब्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

News : भारत-पाकिस्तानमध्ये1971 साली झालेल्या युद्धानंतर बांग्लादेशचा जन्म झाला होता. जो इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. त्याप्रमाणेच आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, अन् बांग्लादेशप्रमाणेच बलुचिस्तानदेखील येत्या काळात स्वतंत्र होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्य परिस्थितीत भारताने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानची कोंडी केली आहे. दुसरीकडे बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बलुचिस्तानमध्ये बंडाचे वारे वेगाने वाहत असून बलुचिस्तानमधील अनेक भूभाग बलुच आर्मीच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे आज झालेले 12 दहशतवादी हल्ले आणि त्यातच बलुचिस्तानमध्ये सुरू असलेली गडबड यावरून स्वतंत्र बलुचिस्तानची लवकरच होणार का ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

गेल्या काही दिवसाचा घटनाक्रम पहिला तर पाकिस्तानने भारतावर दहशतवादी हल्ला करीत संकट ओढवून घेतले आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसातच भारताने पाकिस्तानची मोठी कोंडी करीत बॅकफूटवर नेले आहे. दुसरीकडे पाकिस्तान पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यता दाट आहे. भारताला डिवचल्याचे गंभीर परिणाम पाकिस्तनाला भोगावे लागत आहेत. अणुबॉम्ब ठेवलेल्या शहरांवर ड्रोन हल्ले झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे झेंडा उतरवण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या काळात काय होणार याकडे लक्ष आहे.

1971 मधील घटना व बलुचिस्तानमधील साम्य :

1971प्रमाणेच प्रचंड असंतोष आहे. बांग्लादेशसारखेच, बलुचिस्तानमध्येही केंद्र सरकारबाबत असंतोष आहे. त्याशिवाय या ठिकाणची संस्कृती आणि भाषा वेगळी आहे. या ठिकाणी बंगाली आणि बलुच लोकांची स्वतःची ओळख आणि परंपरा आहेत. राजकीय आणि आर्थिक वंचितपणाचा विचार केला तर बलुचिस्तानला पाकिस्तानमधून अपेक्षित विकास आणि हक्क मिळत नसल्याची तक्रार आहे.

बांग्लादेश व बलुचिस्तानमधील फरक:

बलुचिस्तानमध्ये सामूहिक नेतृत्वाची कमतरता आहे. तर 1971 मध्ये शेख मुजीब-उर-रहमानसारखा एक स्पष्ट नेता होता. बलुच चळवळीमध्ये असे एकवटलेले नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाठिंब्याचा विचार केला तर बांग्लादेशला भारताने लष्करी व आंतरराष्ट्रीय समर्थन दिले आहे. बलुचिस्तानला असा पाठिंबा अजून मिळालेला नाही. लष्करी ताकद आणि माहिती यंत्रणा दोन्ही देशाकडील पहिली तर आजच्या पाकिस्तानकडे अधिक सक्षम लष्कर व गुप्तचर संस्था आहेत.

आंतरराष्ट्रीयस्तरावर पाठिंबा :

अमेरिका, चीन आणि इतर देश बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे उघड समर्थन करत नाहीत. त्यामुळे बलुचिस्तानची मोठी अडचण होत आहे. तर दुसरीकडे चीनचा CPEC प्रकल्प बलुचिस्तानमधून जातो, त्यामुळे चीनला हा भाग अस्थिर होऊ द्यायचा नाही. बांग्लादेशच्या वेळी भारताचा स्पष्ट पाठिंबा होता. बलुचिस्तानबाबत कोणताही मोठा देश उघडपणे स्वातंत्र्याची मागणी करत नाही. अमेरिका आणि युरोपकडे मानवाधिकारांच्या बाबतीत चिंता आहे.

बलुच लिबरेशन आर्मीचा ताबा

बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या (BLA) कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 3 मे 2025 रोजी, BLA ने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील कालात जिल्ह्यातील मंगोचर हे शहर ताब्यात घेतले आहे. बीएलएने सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करून त्यावर नियंत्रण मिळवत अनेक ठिकाणी चेकपॉइंट्स उभारले आहेत.

पाकिस्तानची मोठी कोंडी

भारत आणि बलुच आर्मीमध्ये पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे. BLA ने एक ताजा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यात एका डोंगरदऱ्यातील रस्त्यावर पाकिस्तानी लष्कराचे वाहन जाताना ते आयईडीने उडवण्यात आल्याचे दिसते. या ताज्या हल्ल्यात बीएलएने 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा करण्यात येत आहे.

पाकिस्तानी झेंडे उतरवले

बलुचिस्तानमध्ये पूर्वीपासूनच पाकिस्तानला कडाडून विरोध होता. पण जबरदस्तीने हा भाग पाकिस्तानमध्ये सामावून घेण्यात आला. तेव्हापासून पाकिस्तानविरोधात येथील लोकांचा स्वातंत्र्य लढा सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराने स्थानिक जनतेवर अमानुष अत्याचार केले आहेत. महिलांवर बलात्कार केले आहेत. अनेक बलुच नेत्यांना ठार केले आहे. त्याचा बदला हे लोक घेत आहेत. भारताने गुरुवारी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर बलुच लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. दोन वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणांहून पाकिस्तानचे झेंडे उतरवण्याची मोहीम सुरू होती. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणांहून पाकिस्तानचे झेंडे उतरवले गेले आहेत.

1947 पासून दोन्ही देशात सुरु आहे संघर्ष

बलूचिस्तानसोबत इंग्रजांनी 1876 मध्ये करार केला होता. त्यानुसार, ब्रिटिश राजवटीपासून मुक्त स्वायत्तता या प्रदेशाला बहाल करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान फाळणी वेळी, बलूची नेत्यांनी 5 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली. अखेरचा इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याच्याशी चर्चेदरम्यान बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र राष्ट्राला मान्यतेचा कांगावा केला. पण अवघ्या सात आठ महिन्यातच पाकिस्तानी लष्कर आणि टोळीवाल्यांनी बलूचिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे.

बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याच्या हालचाली आहेत, पण त्या 1971 सारख्या यशस्वी क्रांतीत रूपांतरित होण्यासाठी आवश्यक राजकीय, लष्करी, आंतरराष्ट्रीय, आणि सामाजिक घटक एकत्र येणे अत्यंत अवघड आहे. बलुचिस्तानमध्ये असंतोष आणि फुटीरतावाद आहेत. पण 1971सारखी परिस्थिती तयार होण्यासाठी अनेक घटकांची पूर्तता व्हावी लागणार आहे. स्थानिक एकी, आंतरराष्ट्रीय पाठिंबा, आणि सामरिक संधी. त्यामुळे एकंदरीत या सर्व घडामोडी पाहता सध्याच्या घडीला बलुचिस्तानचे स्वतंत्र होणे अशक्य नाही, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT