विश्लेषण

माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्षांची तर देवकरांना पाच वर्षांची शिक्षा

सरकारनामा ब्युरो



धुळे : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा व शंभर कोटी रूपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. या प्रकरणात 49 आरोपी होते. न्या सृष्टी नीळकंठ यांनी आज दुपारी ही शिक्षा सुनावली. आज न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर त्यांनी पोलिसांना सर्व दोषी व्यक्तींना ताब्यात घ्यायला सांगितले. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षांची शिक्षा, पाच लाख रूपयांचा दंड करण्यात आला आहे. सकाळी न्यायालयाने आदेश दिल्यावर सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार तत्कालिन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नोंदवली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT