eknath_khadse_girish_mahajan.jpg
eknath_khadse_girish_mahajan.jpg 
विश्लेषण

खडसे- महाजनांत आता 51 कोटींच्या कर्जाचा वाद ! 

सरकारनामा ब्युरो

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुप्त वाद आहेत. दोघांनी एकमेकांविरूध्द उघड, कागदोपत्री आरोप कधीच केले नव्हते मात्र महाजन यांनी खडसे यांच्या मुक्ताईनगर कारखान्यास जिल्हा बॅंकेने मंजूर केलेल्या 51 कोटींच्या निधीस आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हा बॅंकेला लेखी पत्र दिल्याने दोन्ही नेत्यांमधीला वाद आता उघडपणे समोर आला आहे. 

खडसे व महाजन यांच्यात नेतृत्वावरून सुरु असलेला वाद जुना आहे. खडसे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करून त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढण्यामागे गिरीश महाजन यांचा हात असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. खडसे यांनीही नाव न घेता हा आरोप केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये आडून शाब्दीक हल्ले सुरूच होते. मात्र कागदोपत्री एकमेकांविरूध्द उघड आरोप दोघांनीही केले नव्हते. मात्र महाजन यांनी खडसे यांच्या मुक्ताईनगर साखर कारखान्यास जिल्हा बॅकेने मंजूर केलेल्या 51 कोटींच्या कर्जास हरकत घेतली आहे. त्याबाबत त्यांनी जिल्हा बॅंकेला पत्र दिले असून हे कर्ज रद्द करावे अशी मागणी केली आहे. 

जळगाव जिल्हा बॅंक युतीच्या ताब्यात आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे बॅंकेच्या चेअरमन आहेत. तर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील बॅंकेचे व्हाईस चेअरमन आहेत. महाजन व खडसे हे दोन्ही बॅंकेचे संचालक आहेत. तर मुक्ताईनगर येथील मुक्ताई शुगर ऍन्ड एनर्जी लिमीटेड हा कारखाना खडसे यांच्या मालकीचा आहे. त्या कारखान्याला वीज निर्मितीसाठी 51 कोटी रूपयाचे कर्ज जिल्हा बॅंकेने मंजूर केले आहे. सर्व संचालकांनी एकमताने त्याला मंजूरी दिली आहे. या सभेला मात्र मंत्री गिरीश महाजन गैरहजर होते. त्यानंतर इतिवृत्ताच्या सभेलाही ते हजर नव्हते. बॅंकेने कर्जास मंजूरी देवून 31 कोटी रूपये अदा केले आहेत. मात्र त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी हरकत घेतली असून दोन दिवसांपूर्वी जिल्हा बॅंकेस पत्र देवून हे कर्ज नियमबाह्य असून ते रद्द करण्यात यावे असे म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT