Sharad Pawar, K. Chandrasekar Rao, Uddhav Thackeray sarkarnama
विश्लेषण

के. चंद्रशेखर राव, ठाकरे अन् पवार भेटीने भाजपसह काँग्रेसच्याही गोटात कुजबुज

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekar Rao) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekar Rao) यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीनंतर भाजपच्याच नाही तर काँग्रेसच्या गोटात ही कुजबुज सुरू झाली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री झालेले के. चंद्रशेखर राव हे काँग्रेसच्या (congress) नेहमीच विरोधात राहिले आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबत राव यांची राजकीय भेट ही भाजप विरोधातील नवी आघाडी उभारण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. अशात काँग्रेसला टाळल्याने के. चंद्रशेखर राव यांची एकजूट काँग्रेसला वगळून असल्याची चर्चा आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या होत्या. मुख्यमंत्री यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची भेट घेता न बॅनर्जी यांनी पवार यांची भेट घेतली होती.

या भेटी नंतर भाजप वर निशाणा साधत केंद्र सरकार विरोधातील तिसरी आघाडी उभारण्याची गरज असल्याचे ममता यांनी सांगले होते. ही आघाडी काँग्रेस वगळता असावी आणि त्याचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे असे सांगत पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शरद पवार यांनी तत्काळ "जे येतील, त्यांना सोबत घेऊ" असे स्पष्ट करत ममता बॅनर्जी यांच्या मतांचे खंडण केले होते. आता के. चंद्रशेखर राव यांनी ही मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीतही काँग्रेस वगळता तिसरी आघाडी उभी करण्याची भूमिका मांडल्याची माहिती आहे.

अर्थातच चंद्रशेखर यांच्या भेटीमुळे पवार यांच्या ममता बॅनर्जी भेटी प्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत ही वाढ होण्याची शक्यता आहे. समान किमान कार्यक्रमावर स्थापण झालेल्या महाविकास आघाडी सरकार मधील प्रत्येक पक्षाने कोणी कोणाला भेटावे याचे बंधन नाही. याच तत्वावर मुख्यमंत्री यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरे राव यांची भेट घेतली. असे असले तरीही मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या फोन वरील चर्चेत के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीची चर्चा झाली असावी, असे मत की काहीजण व्यक्त करत आहेत.

काँग्रेसला दुखवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडिया समोर संवाद साधत काय चर्चा झाली हे सांगितले. मात्र, 75 वर्षात देशात बदल झाला नाही तो बदल करण्यासाठी एकजूट करत आहोत असे तेलंगणचे मुख्यमंत्री म्हणाले. अर्थातच के. चंद्रशेखर यांचा निशाणा भाजप बरोबर काँग्रेसवर ही होता. मात्र, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत काँग्रेस ही असल्याने काँग्रेस चा विरोध करणाऱ्या ममता आणि के. चंद्रशेखर राव यांची सेना आणि राष्ट्रवादी सोबतची भेट काँग्रेस नेत्यांना तितकीशी आवडलेली दिसत नाही.

काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून मोदींविरोधातील लढाई यशस्वी होणार नाही असे ट्विट केले आहे. घटक पक्षांनी बांधणी भाजप विरोधात एकजूट करण्यास सुरुवात केली असली तरीही ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव यांच्या काँग्रेस विरोधातील ही आहे हे लक्षात घेत काँग्रेसच्या पोटात दुखू लागले आहे. आतापर्यंत अनेक घटक पक्षांनी एकत्र येत केंद्रात सत्तेत असलेल्या सरकार विरोधात तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयशच आले. आता ही राष्ट्रीय पक्षाला सोबत न घेता केंद्रात सत्ता आणणे हे कठीण आहे. यामुळे ममता आणि त्यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस वगळता तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादीला पुढच्या काळात मान्य असेल का? काँग्रेसचा ही 2024 ला केंद्रात सत्ता आणण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभाग व्हावा यासाठी प्रयत्न होतील का? हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT