विश्लेषण

यशवंतराव मोहितेंचे कार्य हा माझा आदर्श : डॉ. विश्‍वजित कदम

सरकारनामा ब्युरो

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) : सहकार राज्यमंत्रीपद सांभाळताना माजी मंत्री यशवंतराव मोहिते (भाऊ) यांचे कार्य हा माझा आदर्श राहणार असून, त्यांच्या सहकारातील कार्याचा माझ्या वाटचालीत निश्‍चित फायदा होईल. पतंगराव कदम आणि यशवंतराव मोहिते यांचे गुरु-शिष्याचे नाते होते. कदम आणि मोहिते कुटुंबाचे ऋणानुबंध यापुढेही कायम राहतील, असा विश्‍वास सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी व्यक्त केला. 
डॉ. विश्वजित कदम यांनी आज (मंगळवारी) कऱ्हाडमध्ये भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. सविता मोहिते, मंत्री कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम, जितेश कदम, आदित्य मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रारंभी मंत्री कदम यांचे डॉ. मोहिते यांच्या मोहिते आरोग्य सेवा हॉस्पिटल आवारात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तसेच मोहिते कुटुंबिंयोनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मंत्री कदम यांचे मोहिते यांच्या निवासस्थानी डॉ. सविता मोहिते यांनी औक्षण करून स्वागत केले. यानंतर डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी मंत्री कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी श्री. कदम यांनी महाराष्ट्राचे थोर विचारवंत (कै.) यशवंतराव मोहिते यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी कदम व मोहिते

कुटुंबियांचा एकत्रित चहापान झाले. मंत्री कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी राज्यातील सहकारामध्ये उत्तुंग कार्य केले आहे. त्यांनी सहकारी साखर कारखानदारीला चालना देण्याबरोबर सहकारातील श्वेतपत्रिका तयार केली. सहकार मंत्रीपद सांभाळताना भाऊंचे कार्य हा माझा आदर्श राहणार असून, यशवंतराव मोहिते यांच्या सहकारातील कार्याचा माझ्या वाटचालीमध्ये निश्‍चितच फायदा होईल. पतंगराव कदम आणि यशवंतराव मोहिते यांचे गुरु-शिष्याचे नाते होते. कदम आणि मोहिते कुटुंबाचे ऋणानुबंध कायम राहतील. डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या सहकारातील अभ्यासाचा माझ्या कार्यात मी उपयोग करेन. यावेळी सविता मोहिते यांनी ना. कदम यांचे तोंडभरून कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT