नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B. S.Yediyurappa) हे जाऊन बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे मुख्यमंत्री झाले आहेत. येडियुरप्पांना पुत्रप्रेम भोवले होते आणि त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आता बोम्मईंच्या बाबतीत याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसू लागली आहे. बोम्मईंचा मुलगाही सरकारी कार्यक्रमात दिसू लागला आहे. काँग्रेसनेही याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत होते. विजयेंद्र हे राज्य भाजपचे उपाध्यक्ष आहेत. मुलामुळेच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विजयेंद्र यांनी वगळून पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पांना मोठा धक्का दिला जाते. येडियुरप्पांनी पुत्राच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने याला महत्व दिले नसल्याचे समोर आले होते.
बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली त्यावेळी त्यांनी कुटुंबीयांना संदेश दिला होता. तुम्ही खूप आनंदी आहात परंतु, तुम्हाला कायम आनंदी राहायचे असेल तर राजकारणाच्या जवळ येऊ नका. माझ्या पेशापासून दूर राहा पण माझ्या जवळ राहा, असा सल्ला त्यांनी कुटुंबीयांना दिला होता. आता बोम्मईंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तेसुद्धा येडियुरप्पांप्रमाणे सापळ्यात अडकले आहेत. त्यांचा मुलगाही आता सरकारी कार्यक्रमात दिसू लागला आहे.
काँग्रेसने यावरुन बोम्मईंना लक्ष्य केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, तुम्ही उद्योगपतींना भेटत असताना तुमचा मुलगा तिथे काय करत होता? तुम्हाला घराणेशाहीचे राजकारण कायम सुरू ठेवायचे आहे का? येडियुरप्पा सत्तेत असताना त्यांचा मुलगा विजयेंद्र अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असे. आता तुम्ही त्यांच्याच मार्ग अनुसरत आहात. धृतराष्ट्राप्रमाणे प्रेम करणे चांगले नाही.
बायोकॉन लिमिटेडच्या किरण मुजुमदार शॉ यांनी बोम्मई यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी उद्योगपती अझीम प्रेमजी आणि मोहनदास पै उपस्थित होते. परंतु, बोम्मई यांचे पुत्र भारत हेसुद्धा उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भारत हे उद्योगपती आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.