विश्लेषण

कोपर्डीतल्या 'त्या' कथित स्मारकाला संभाजी ब्रिगेडला विरोध

कोपर्डीतील हत्याकांडाने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असुन याचा अनुभव देश विदेशात मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने पहायला मिळाला. परंतु या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा आटापिटा अनेकांनी चालवला आहे. - संभाजी ब्रिगेड

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोपर्डीतल्या घटनेनंतर मराठा समाजामध्ये अन्याया विरोधात चेतना जागवण्याचे काम झाले असले तरीही पीडित मुलीच्या नावाचे कथित स्मारक बांधण्याचा मनोदय भय्यु महाराज यांनी केला आहे. या स्मारकाला संभाजी ब्रिगेड विरोध यांचा असून हे स्मारक कोणत्याही परिस्थितीत उभारू देणार नाही, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज पाखरे यांनी दिला.

''कोपर्डीतील हत्याकांडाने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असुन याचा अनुभव देश विदेशात मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने पहायला मिळाला. परंतु या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा आटापिटा अनेकांनी चालवला आहे.  भैय्यु महाराज यांनी कोपर्डी येथे पीडित मुलीचे स्मारक उभारून श्रेय घेण्याचा बालिश प्रयत्न करू नये. स्मारके हे शौर्याचे व पराक्रमाची आठवण करून देणारी असतात. कोपर्डीत जे घडलं ते पाहून सह्याद्रीची मान देखील शरमेने खाली गेली आहे. अशाप्रसंगी स्मारक उभारून मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भैय्यु महाराज करीत आहेत. परंतू, त्यांचा हा डाव संभाजी ब्रिगेड कदापी पुर्ण होऊ देणार नाही,'' असा इशारा पाखरे यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT