विश्लेषण

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील 500 प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवल

सरकारनामा ब्युरो

पुणे - मुसळदार पावसामुळे वांगणी ते बदलापूर दरम्यान रुळांवर पाणी आल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या पंधरा तासांपासून एकाच जागेवर उभा आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार प्रवासी अडकून पडले आहेत. त्यातील 500 प्रवाशांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 9 गरोदर महिलाही या रेल्वेमध्ये अडकल्याची माहिती समोर येते आहेत.

एक्सप्रेस एकाच जागेवर थांबून राहिल्यामुळे पाणी डब्यापर्यंत आल्याचे काही व्हिडिओंमध्ये दिसत आहे. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नॅशनल डिजास्टर रिलिफ फोर्स (एनडीआरएफ) ने मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. एनडीआरएफबरोबरच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि स्थानिक पोलिस, ग्रामस्थही मदतीसाठी धावले आहेत. सात जणांची एनडीआरएफने सुटका केली असून, त्यांना बदलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT