Maharashtra Assembly Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : महायुती, आघाडीचे टेन्शन वाढवणारे 35 मतदारसंघ; 5 हजारांपेक्षा कमी होते मताधिक्य

Maharashtra Assembly Election 2019 Mahavikas Aghadi Mahayuti : 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होती. यावेळी चारऐवजी सहा पक्ष मैदानात आहेत.   

Rajanand More

Pune News : राज्याची यंदाची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष युती आणि आघाडीतून रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात जणू काँटे की टक्कर आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस-काँग्रेस आणि भाजप-शिवसेना अशी थेट लढत होती. तरीही 35 मतदारसंघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.

पक्ष फुटीनंतर या 35 मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. पण असे असले तरी हे मतदारसंघ यावेळी उमेदवारांचे टेन्शन वाढवणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. राज्यातील पाच असे मतदारसंघ आहेत, जिथे 2019 च्या निवडणुकीत एक हजारांहून कमी मताधिक्याने विजय साकार झाला होता.

मुंबईतील चांदिवली मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा केवळ 409 मतांनी पराभव केला होता. तर अर्जूनी-मोरगाव या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे 718 मतांनी विजयी झाले होते. पुणे जिल्हयातील दौंड मतदारसंघात राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांना 746 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. या मतदारसंघातू भाजपच्या तिकीटावर राहुल कुल विजयी झाले. (Mahayuti)

सांगोलामध्ये शहाजीबापू पाटील हे 768 तर कोपरगाव मतदारसंघातून आशुतोष काळे हे केवळ 822 मतांनी विजयी झाले होते. याशिवाय भिंवडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड मतदारसंघात विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये एक ते दोन हजार मतांचा फरक होता. (Mahavikas Aghadi)

राज्यातील 26 विधानसभा मतदारसंघामध्ये विजयी उमेदवाराला दोन ते पाच हजारांच्या मताधिक्याने विजय मिळाला होता. त्यापैकी 12 मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. दरम्यान, 2019 ची विधानसभा निवडणूक आणि यंदाच्या निवडणुकीतील राजकीय स्थिती पूर्णपणे बदलली आहे. दोन पक्ष फुटल्याने या पक्षांची मते महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या उमेदवारांना मिळणार का, त्याचा फटका कुणाला बसणार, कुणाला फायदा होणार, याबाबत उत्सुकता आहे. यंदाही अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते.

दोन ते पाच हजारांचे मताधिक्य असलेले मतदारसंघ :

अक्कलकुवा, धुळे शहर, पाचोरा, अकोला पश्चिम, रिसोड, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, यवतमाळ, अर्णी, नांदेड दक्षिण, जिंतूर, घनसांवगी, भोकरदन, सिन्नर, डहाणू, बोईसर, उल्हासनगर, कलिना, इंदापूर, वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर, बार्शी, माळशिरस, माण, चंदग़ड.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT