Local Body Election Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra local body polls : 'बंड'खोरांच्या वादळात महायुतीची परीक्षा; स्थानिक निवडणुकीत विरोधकांना सुटणार घाम

rebel leaders Maharashtra politics News : राज्यातील सर्वच पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुती व महविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याबाबतचे पत्ते ओपन केले नाहीत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे आता येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यामध्ये होणार असल्याचे समजते. दिवाळी झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुती व महविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याबाबतचे पत्ते ओपन केले नाहीत. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असल्याने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने विरोधकाची मोठी दमछाक होणार आहे. साधारणता दिवाळीच्या आसपास निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर तीन ते सव्वा तीन महिने हाच टेम्पो टिकून ठेवायचा आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीने केली आहे. मात्र, या निमित्ताने महायुतीमधील भाजप (BJP), एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.

येत्या काळात होत असलेल्या स्थानिकच्या निवडणुकीसाठी महायतीमधील तीन पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे दबाबावामुळे का होईना त्यांची पुन्हा युती होण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीला या निवडणुकीत विरोधकापेक्षा सत्ताधारी मित्रपक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या महायुतीमधील या तीनही पक्षाच्या नेते मंडळाची कस लागणार आहे.

येत्या काळात सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक होतील तर मधल्या काळात म्हणजेच डिसेंबर नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर जानेवारी महिन्यात मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांचा सर्वच पक्षांचा कस लागणार आहे.

या निवडणुकीसाठी महायुतीमधील तीन पक्षावर एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आहे. त्यामुळे त्यांची महायुती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन पक्षात बंडखोरीचे पेवच फुटणारच आहे. सर्वाधिक बंडखोरी महायुतीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे राजकारणात अजून एक नवीन खिचडी होताना दिसणार आहे. विशेषता महायुतीला आव्हान महाविकास आघाडीपेक्षा स्थानिक नेत्यांचेच असणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बंडखोर दिसणार आहेत. त्याचा फटका कोणाला बसणार हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल दिसत नाही. राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे यांनी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीसोबत जाणार की आघाडीच्या बाहेर पडणार यावर बरेच चित्र अवलंबून आहे. काँग्रेसने त्यांची भूमिका ठरवलेली नाही. हायकमांडच्या आदेशाने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढणार की स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार यावर बरीच गणिते अवलंबुन आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT