Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट : माझ्या आणि फडणवीसांच्या संपर्कात अनेक आमदार...

आपल्या पक्षाचे आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये; म्हणून अशी विधाने केली जातात. सगळं काय आमच्यासारखं असतात का?

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : माझ्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संपर्कात खूप लोकं (आमदार MLA) आहेत. पण आम्हाला त्याची आवश्यकता नाही. कारण, आमच्याकडं १६८-१७० आमदार आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी विरोधी पक्षांना १०७ मतं मिळाली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ती ९९ झाली. ते लोक आमच्याकडं स्वतःहून येत आहेत, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात दिलेल्या मुलाखतीत केला. (Many MLAs are in touch with me and Fadnavis : Eknath Shinde)

ठाणे येथे १७५ संस्थांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्याच कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान शिंदे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीसंदर्भात केलेल्या भाकितासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, आपल्या पक्षाचे आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये; म्हणून अशी विधाने केली जातात. सगळं काय आमच्यासारखं असतात का. आमच्यातील काही जण मंत्री असतानाही सत्ता सोडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षांना आपले आमदार सांभाळायचे असतात. पण माझ्या आणि फडणवीस यांच्या संपर्कात खूप आमदार आहेत. कारण त्यांना विश्वास आहे की दिलेला शब्द पाळणारे कमी असतात. त्यामुळे ते स्वतःहूनच आमच्याकडे येत आहे.

दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस तब्बल दहापेक्षा जास्त आमदार अनुपस्थित होते. त्यात एका माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. तसेच, एका माजी मुख्यमंत्र्यांची आमदार मुलगीही गैरहजर होती. त्याचा दखल काँग्रेस हायकमांडने घेऊन त्याबाबात फोन करून विचारणा केली होती. तसेच काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांची कानउघडणी करत तुम्ही असे कसले नियोजन करता, असा सवालही विचारला होता.

दरम्यान, ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीत असताना राष्ट्रवादीकडून होणाऱ्या अडचणीवरही भाष्य केले. महाविकास आघाडीचे सरकार आणखी अधिक काळ सत्तेत राहिले असते तर काय झालं असतं. यावर शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी उघडपणे म्हणत होते की पुढचा मुख्यमंत्री आमचाच. शंभर प्लस जागा निवडून आणण्याचे त्यांनी टार्गेट ठेवले होते. शिवसेना आमदाराच्या मतदारसंघात जाऊन उदघाटनं करणं, सभा घेणे यावरून काय होणार होते, हे सांगण्याची कोणा ज्योतिषाची गरज पडली नसती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT